कृषि उत्पन्न बाजार समिती, उमरेड
उमरेड हे शहर प्राचीन व ऐतिहासिक श्हर असुन सोळाव्या शतकात चांदा (सध्याचे चंद्रपुर) येथील गोंड राजे करणशहा यांनी उमरेड हे शहर वसवले. हे शहर आम नदीच्या काठावर वसलेले असुन गावात गोंड राजे करणशहा यांनी बांधलेला एक जुना प्राचीन कील्ला आहे. हा किल्ला पिवळया वालुकाश्म (Red - yellow Sandstone) दगडांनी बांधलेला असुन पुर्वी याला एक मोठी तटबंदी होती. उमरेडचा किल्ला हा गोंड साम्राज्याच्या समृध्द इतिहसाचा एक महत्वाचा पुरावा आहे. मोठे व्यापारी केंद्र होते. हे ठीकाण नंतर भोसले आणी १८५० मध्ये ब्रिटीशांच्या ताब्यात गेले. गावाशेजारी दोन मोठे तलाव असुन या तलावांमध्ये येथे मोठया संख्येने असलेला कोळी समाज शिंगाडयाची (Water Chestnut) लागवड करतो. व्यापारी केंद्र - या ठीकाणी विणकर समाज मोठया संख्येने असुन येथील रेशीमकाठी धोतर व साडयाकरीता पुर्वि फार प्रसिध्द होते. येथील मीर्ची बाजार अतीशय प्रसिध्द होता. येथील तलावामध्ये शिंगाडयाचे (Water Chestnut) उत्पादन व विक्री मोठया प्रमाणात होते.
सर्व माहितीसाठी....
